पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्या सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठी दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना हार्दिकला आराम मिळाला नाही. तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला, पण यावेळी त्याला दुखापत झाली. त्यामुळे हार्दिकला तंबूत परतावं लागलं.
हार्दिक पंड्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. हार्दीक पांड्यामुळे भारतीय संघ संतुलीत होतो. कारण तो गोलंदाजी सोबत उत्तम फलंदाजी देखील करतो. हार्दिकला दुखापत झाल्यानंतर आता सर्व मदार शार्दूल ठाकूर याच्यावर आली आहे.
या सामन्यातील आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नाही. नववं षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. यावेळी त्याने पहिला चेंडू निर्धाव फेकला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर मात्र हार्दिकला दुखापत झाली. हार्दिक चेंडू अडवण्यासाठी गेला मात्र यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली.
यावेळी हार्दिकला प्रचंड वेदाना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले. हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी केला. पण त्याची वेदना वाढली. त्यामुळे त्याला मैदानातून परतावं लागलं. यानंतर हार्दिक पांड्याच्या षटकातील तीन चेंडू टाकण्यासाठी विराट कोहली आला. विराट कोहलीने सहा वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली.
दरम्यान, पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात सामान सुरु आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शन्तो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतयी संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. आजच्या सामन्यात टीम इंडियात कोणताही बदल करण्यात आला नाही.