भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर; पुजारा, गिलच्या शतकांमुळे बांग्लादेशसमोर धावांचा डोंगर

शुभमन गिलने त्याचे कसोटी कारकिर्दीतला पहिले शतक झळकावले तर पुजाऱ्याने तब्बल ५२ डावांनंतर कसोटीमध्ये शतक झळकावले
भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर; पुजारा, गिलच्या शतकांमुळे बांग्लादेशसमोर धावांचा डोंगर
Published on

भारतीय संघाने बांग्लादेशविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात ५१३ धावांचा डोंगर रचला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून २ दमदार शतके आली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेश बिनबाद ५० धावांवर होता.

भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने कसोटीमधील पहिले शतक झळकावत ११० धावांची खेळी केली. तर, दुसरीकडे चेतेश्वर पुजाऱ्याने संयमी फलंदाजी करत तब्बल ५२ डावानंतर शतक झळकावले. यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात २ बाद २५८ धावांची खेळी करू शकला.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा कर्णधार केएल राहुल अपयशी ठरला. तर विराट कोहली हा १९ धावांवर नाबाद राहिला.

पुजाऱ्याने १९वे शतक झळकावताच केएल राहुलने डाव घोषित केला. भारतीय संघाने या कसोटी सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच. आता भारतीय संघ हा विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १५० धावांवर गारद झाला. भारताने २५८ धावांवर दुसरा डाव घोषित केला.

logo
marathi.freepressjournal.in