T-20 WC : इंग्लंडनं टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडियापुढं मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष्य

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य असेल.
T-20 WC : इंग्लंडनं टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडियापुढं मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष्य
Twitter

गयाना : टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आज टीम इंडियाचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये हा सामना होत असून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य असेल. दरम्यान आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही

सेमी फायनल सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन:

भारत : विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) , रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, फिल सॉल्ट, रीस टॉप्ली, मार्क वूड.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमच्या मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्यापुढे एकच लक्ष्य असेल ते म्हणजे अंतिम फेरीचे. इंग्लंडनेच २०२२च्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत धूळ चारून पुढे स्पर्धाही जिंकली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा घेण्यासह थाटात अंतिम फेरीत धडक मारण्याची भारताला सुवर्णसंधी आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असेल.

प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली अखेरची स्पर्धा खेळणारा भारतीय संघ अद्याप अपराजित आहे. साखळीत ३ सामने जिंकल्यानंतर भारताने सुपर-८ फेरीत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांना नेस्तनाबूत केले. सांघिक कामगिरी भारताच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करणारा भारतीय संघ व सध्याच्या संघात फार बदल झाला आहे. यंदा भारताला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची उत्तम संधी असून ते इंग्लंडला कमी लेखणार नाहीत.

दुसरीकडे जोस बटलरच्या इंग्लंडने साखळीत संघर्ष केला. सुपर-८ फेरीतही त्यांना आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र वेस्ट इंडिज आणि अमेरिका या संघांना त्यांनी एकतर्फी नामोहरम करून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. गेल्या चारही टी-२० विश्वचषकात इंग्लंडने उपांत्य फेरी गाठलेली आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांचा भारताने दारुण पराभव केला होता. त्यामुळे इंग्लंडही त्या पराभवाची परतफेड करण्यासह सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यास आतुर आहे.

logo
marathi.freepressjournal.in