INDvsNZ : द्विशतक एक, विक्रम अनेक! शुभमन गिलची अनोखी ऐतिहासिक कामगिरी

भारत आणि न्यूझीलंडमधील (INDvsNZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने धमाकेदार द्विशतक करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले
INDvsNZ : द्विशतक एक, विक्रम अनेक! शुभमन गिलची अनोखी ऐतिहासिक कामगिरी

श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडसोबत ((INDvsNZ)) ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. अशामध्ये पहिल्याच सामन्यात एकीकडे दिग्गज फलंदाज बाद होत असताना दुसरीकडे तरुण शुभमन गिलने (Shubhman Gill) एक बाजू सांभाळत धमाकेदार द्विशतक पूर्ण केले. याचसोबत त्याने या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. हे त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच द्विशतक ठरले.

द्विशतकवीर शुभमन गिलने रचला इतिहास:

- द्विशतक करणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला २३ वर्षीय गिल

- एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पाचवा भारतीय फलदांज

- हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये गिलने सचिन तेंडुलकरचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही मोडला

- सलग 3 षटकार मारत द्विशतक पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला शुभमन गिल

- गिल ठरला एकदिवसीय सामन्यात सर्वात जलदगतीने १००० धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज. त्याने १९ डावांमध्ये ही कामगिरी करत विराट कोहलीचा (२४ डाव) विक्रम मोडत काढला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in