भारत दौऱ्याआधी साऊदीने सोडले न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद; नव्या कॅप्टनची झाली घोषणा

IND vs NZ Test Series : १६ ऑक्टोबरपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे.
टॉम लॅथमकडे (डाव्या बाजूला) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे कर्णधारपद, टिम साऊदी (उजवीकडे)
टॉम लॅथमकडे (डाव्या बाजूला) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे कर्णधारपद, टिम साऊदी (उजवीकडे)छायाचित्र : एक्स
Published on

ऑकलंड : वेगवान गोलंदाज टिम साऊदीने बुधवारी न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी टॉम लॅथमकडे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

३५ वर्षीय साऊदीने डिसेंबर २०२२पासून न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले. केन विल्यम्सन पायउतार झाल्यावर तो कसोटीमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली किवी संघाने १४ कसोटींपैकी ६ लढती जिंकल्या. ६ सामन्यांत त्यांचा पराभव झाला, तर २ सामने अनिर्णित राहिले. साऊदी १०२ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि १२६ टी-२० सामने खेळला आहे. मात्र निवृत्तीविषयी अद्याप त्याने विचार केलेला नाही. श्रीलंकेविरुद्ध नुकताच झालेल्या मालिकेत न्यूझीलंडला ०-२ असा पराभव पत्करावा लागला.

आता १६ ऑक्टोबरपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी डावखुरा फलंदाज लॅथम न्यूझीलंडचे कर्णधारपद भूषवेल. विल्यम्सनने टी-२० विश्वचषकातून संघ बाहेर पडल्यावर एकदिवसीय व टी-२० संघाचे कर्णधारपदही सोडले होते. मात्र त्या प्रकारातील कर्णधाराचा कोण असेल, याविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in