IND vs PAK, ICC World Cup 2023 : भारतीय संघाने नाणेफेक जिंकली ; रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) याच्यातील महासंग्रामला सुरुवात झाली आहे
IND vs PAK, ICC World Cup 2023 : भारतीय संघाने नाणेफेक जिंकली ; रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Published on

आज गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) याच्यातील महासंग्रामला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामान्यात भारतीय संघाचे(Team India) पारडे जड मानले जात आहे. टीम इंडिया गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समतोल आहे. भारताचे फिरकी गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. तर पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज त्यामानाने फॉर्मात नाहीत. भारतीय संघ याचा फायदा घेण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ आणि पाकिस्तानचा संघ या पारंपारिक प्रतिस्पर्धी विश्वचषक सामन्यासाठी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअम सज्ज आहे. भारत आणि पाकिस्तानी संघांमधला आजचा सामना हा महामुकाबला मानला जातो. अवघ्या क्रिकेट विश्वात हा सर्वाधिक उस्तुकता असलेला हा सामाना मानला जातो. या मामन्याला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

विश्वचषकात आजपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सात सामने खेळवण्यात आले आहे. यात पाकिस्तान संघाला एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानला या सातही सामन्यात लाजीरवाना पराभव करावा लागला आहे. आजच्या सामान्यात अपयशाची ही मालिका खंडित करण्याचा पाकिस्तान संघ पुरेपूर प्रयत्न करणार आहे. पाकिस्तान सघाने यंदाच्या विश्वचषकातील नेदरलँड आणि श्रीलंका संघाला हरवून आपली ताकद दाखवून दिली आहे.

आजच्या भारत-पाक सामन्यात धावांचा पाऊस पडू शकतो. येथील खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल असल्याचं सांगितलं जातं. गोलंदाजांचा मोठा कस लागण्याची शक्यता या मैदानावर आहे. सामना जस जसा पुढे जाईस तस तसा गोलंदाजीला फायदा होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर

पाकिस्तान संघ

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.

logo
marathi.freepressjournal.in