भारत-श्रीलंकामध्ये आज पहिला टी-२० सामना; कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाला प्रारंभ

IND vs SL : भारतीय क्रिकेटमध्ये शनिवारपासून कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाला प्रारंभ होणार आहे.
भारत-श्रीलंकामध्ये आज पहिला टी-२० सामना;
कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाला प्रारंभ
Published on

पालेकेले : भारतीय क्रिकेटमध्ये शनिवारपासून कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. एकीकडे सूर्यकुमार यादव भारताच्या टी-२० संघाचे पूर्णपणे कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातीन तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला शनिवारी प्रारंभ होईल.

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी टी-२० विश्वचषक जिंकल्यावर या प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतापुढे नव्याने संघबांधणीचे आव्हान असेल. दुसरीकडे चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ खेळणार असून या संघातही काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

वेळ : सायं. ७ वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनी

logo
marathi.freepressjournal.in