
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने धम्माकेदार कामगिरी केली आहे. त्याने केलेल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने सर्वजन हैराण झाले आहेत. तर श्रीलंकेच्या फलंदाजांना नेमकं काय करावं तेच कळेना झाल्याचं चित्र दिसत आहे. सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुजघे टेकले आहेत. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आतापर्यंत सिराजने श्रीलंकेच्या पाच खेळाडूंना तंबूत पाठवलं आहे.
मोहम्मद सिराज आणि बुमराह यांच्या माऱ्यापुढे श्रीलंकेची अवस्था केवीलवानी झाली आहे. सिराजने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचं कंबरडं मोडलं आहे. त्याने एकामागे एक विकेट घेत आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचे फलंदाज अपयशी ठरले आहेत.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना त्यांचा हा निर्णय महागात पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. भारतीय गोलंदांची त्यांची दयनिय अवस्था केली आहे. सुरुवातीला जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तंबूत नेला. त्यानंतर मोहम्मद सिराजने फेदक मारा करत एकाच षटकात श्रीलंकेचे चार फलंदाज तंबूत पाठवले. मोहम्मद सिराजच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.