मुंबईतील वानखेडे मैदानांत आज भारत आणि श्रीलंकेचा सामना सुरु आहे. आज श्रीलंकेच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जबरदस्त फॉर्मात असलेला भारतीय खेळाडू रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानांत उतरले आहेत. यावर्षीच्या विश्वचषकात रोहित शर्मान धावांचा पाऊस पाडला आहे. पण घरच्या मैदानावर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला.
रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर आज तो मोठी धावंसख्या उभारणार, असं सगळयांना वाटलं होतं. पण दुसऱ्याचं चेंडूवर मधुशंकाने त्रिफाळा उडवला. महत्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी 2013 साली रोहित शर्मानं द्विशतक ठोकलं होते. आजही रोहित शर्मा द्विशतक ठोकेल, असंच सगळयांना वाटलं होतं. पण चाहत्यांच्या अपेक्षांवर रोहित शर्माने पाणी फेरलं आहे. रोहित शर्मा चक्क चार धावा काढून तंबूत परतल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा हा वानखेडे मैदानावर पहिल्यांदाच एकदिवशीय सामना खेळत होता. त्यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. वानखेडे मैदानावर रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर माघारी परतला. त्याला मधुशंकाने त्रिफाळाचीत बाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर वानखेडे मैदानांत शांतता पसरली आहे.