भारत-अ संघाचा न्यूझीलंड दौरा : बुमरा, प्रसिधच्या तंदुरुस्तीचा कस

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना सरावाची चांगली संधी मिळणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णा आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या उपस्थितीत भारत ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध चार दिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळणार आहे.
भारत-अ संघाचा न्यूझीलंड दौरा : बुमरा, प्रसिधच्या तंदुरुस्तीचा कस
भारत-अ संघाचा न्यूझीलंड दौरा : बुमरा, प्रसिधच्या तंदुरुस्तीचा कस (Photo-X)
Published on: 

लिंकन : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना सरावाची चांगली संधी मिळणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णा आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या उपस्थितीत भारत ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध चार दिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना शनिवारपासून लिंकन येथे सुरू होईल.

बुमराने अखेरचा सामना ३ ऑक्टोबर रोजी आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला होता. न्यूझीलंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली असून, त्याचा समावेश केवळ कसोटी मालिकेच्या तयारीसाठी करण्यात आला आहे. खेळाचा वाढता ताण लक्षात घेऊन त्याच्या कार्यभाराचे नियोजन करण्यात आले आहे. १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड ‘अ’विरुद्धच्या या सामन्यात बुमराहला अधिकाधिक गोलंदाजी करण्याची आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळेल.

स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला प्रसिध कृष्णा कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. त्याने अखेरचा सामना ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. न्यूझीलंडच्या वेगवान आणि थंड हवामानात गोलंदाजीचा सराव त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी रणजी करंडक स्पर्धेतील दोन सामने खेळले. या दोन सामन्यांत त्याने सात बळी मिळवण्यासोबतच शतकी खेळीही केली. एकदिवसीय संघातील स्थान गमावल्यानंतर जडेजा आता अष्टपैलू योगदान देण्यास नक्कीच आतुर असेल, हे निश्चित.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)