India at Olympics, Day 8 Full Schedule: पदकांच्या चौकारासाठी दावेदारी; बघा भारताचे ३ ऑगस्टचे वेळापत्रक

शनिवारी नेमबाजीसह तिरंदाजी, सेलिंग , बॉक्सिंगमध्ये भारताला चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.
India at Olympics, Day 8 Full Schedule: पदकांच्या चौकारासाठी दावेदारी; बघा भारताचे ३ ऑगस्टचे वेळापत्रक
AFP
Published on

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताने नेमबाजी, हॉकी, बॅडमिंटन या प्रकारांत चमकदार कामगिरीची नोंद केली. भारताला आता शनिवारी चौथ्या पदकावर मोहर उमटवण्याची सुवर्णसंधी आहे. मनू भाकरने २५ मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. दुसरीकडे हॉकीत भारताने ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्याशिवाय बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत ऐतिहासिक धडक मारली आहे. तिरंदाजीत मात्र भारताला पदकाने हुलकावणी दिली. आता शनिवारी नेमबाजीसह तिरंदाजी, सेलिंग, बॉक्सिंगमध्ये भारताला चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

आजचे वेळापत्रक

> नेमबाजी

२५ मीटर पिस्तूल महिला अंतिम फेरी

मनू भाकर (पदकासाठी दावेदारी)

(दुपारी १ वा.)

स्कीट (महिला पात्रता पहिला दिवस)

राइझा ढिल्लोन, महेश्वरी चौहान

(दुपारी १२.३० वा.)

स्कीट (पुरुष पात्रता तिसरा दिवस)

अनंतजीत सिंग

(दुपारी १२.३० वा.)

> तिरंदाजी

महिला बाद फेरी (राऊंड ऑफ १६)

दीपिका कुमारी वि. मिचेल क्रोपेन

(दुपारी १.५० वा.)

भजन कौर वि. डायनांडा चोरुनिसा

(दुपारी २.०५ वा.)

> सेलिंग

पुरुषांची पाचवी शर्यत

विष्णू सरवानन

(दुपारी ३.४५ वा.)

महिलांची पाचवी शर्यत

नेत्रा कुमानन

(सायंकाळी ५.५५ वा.)

> बॉक्सिंग

पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी (७१ किलो)

निशांत देव वि. मार्को वेर्डे

(मध्यरात्री १२.१५ वा.)

logo
marathi.freepressjournal.in