शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले

गुरुवारी एकंदर मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे सात गट खेळविले गेले.
शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले

शरीरसौष्ठवामध्ये भारतच बाहुबली असल्याचे सिद्ध झाले. मालदीव येथे झालेल्या ५४व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भारताने अखेरच्या दिवशी तब्बल सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले. त्याशिवाय भारताच्या यतिंदर सिंगने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब पटकावून मालदीवमध्ये तिरंगा फडकावला. भारताने एकूण ३८ पदके जिंकली. यामध्ये १३ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कांस्यपदकांचा समावेश आहे.

गुरुवारी एकंदर मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे सात गट खेळविले गेले. त्यापैकी सहा गटात भारतीयांनी बाजी मारली. केवळ ७५ किलो वजनी गटात इराणचा अली इस्माइलझादेह विजेता ठरला. ७० किलो वजनी गटात हरीबाबूने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर ८० किलो गटात अश्विन शेट्टी सर्वोत्तम ठरला. ८५ किलोमध्ये यतिंदरने थायलंडच्या अपिचाय वांडीवर सरशी साधली. ९० किलो गटात एम. सर्वानन विजेता ठरला. १०० किलो गटात कार्तिकेश्वरने जेतेपद मिळवले, तर १०० किलोहून अधिक वजनी गटात अनुज कुमार अजिंक्य झाला. अशाप्रकारे सातपैकी सहा गटात भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी बाजी मारली. त्यानंतर सर्व विजयी खेळाडूंमध्ये झालेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबाच्या लढतीत चार वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या यतिंदरने सर्वस्व पणाला लावून जेतेपद मिळवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in