

मोकी, चीन : 'एएचएफ ज्युनिअर पुरुष आशियाई चषक' हॉकी स्पर्धेत पाचवेळच्या विजेत्या भारतीय संघाने आपल्या जेतेपदाच्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या अ गटातील पहिल्याच सामन्यात भारताने इंडोनेशियाचा १४-० असा पुरता धुव्वा उडवला.
भारताच्या या एकतर्फी विजयात कर्णधार अनमोल एक्का, प्रभदीप सिंग आणि अजित यादव यांनी मिळून १२ गोल लगावले. भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ करत इंडोनेशियाच्या गोलपोस्टवर सातत्याने हल्ले चढवले. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला प्रभदीप सिंगने मैदानी गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर आठव्या मिनिटाला हरपालने गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. दुसऱ्या सत्रात १६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर कर्णधार अनमोल एक्काने पहिला गोल केला.
आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताला मध्यंतरापर्यंत ६-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. २० व्या मिनिटाला अजित यादवने गोल करत धावसंख्या ४-० केली. यानंतर प्रभदीप सिंगने २६ व्या आणि ३० व्या मिनिटाला सलग गोल करत दिली.
उत्तरार्धातही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम राहिले. ३५ व्या आणि ४२ व्या मिनिटाला अनमोलने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. तिसऱ्या सत्राच्या शेवटी प्रभदीपने आणखी एक गोल नोंदवल्याने भारताची आघाडी ९-० झाली. चौथ्या आणि अंतिम सत्रात भारतीय आक्रमकांनी गोलची खैरात करत आणखी ५ गोल डागले. ५१ व्या मिनिटाला अनमोलने सामन्यातील आपला चौथा गोल केला, तर ५२ व्या मिनिटाला प्रभदीपने वैयक्तिक पाचवा गोल नोंदवला.
५३ व्या मिनिटाला अजितने एकाच मिनिटात दोन गोल करत आपली हॅटट्रिक साजरी केली आणि धावसंख्या १३-० वर पोहोचवली.