भारताचा थायलंडवर नऊ गडी राखून विजय; स्नेह राणा प्लेयर ऑफ द मॅच

स्नेह राणाने ४ षटकांत ९ धावा देत ३ गडी बाद करत प्रथम गोलंदाजीचा निर्णय यशस्वी ठरविला
भारताचा थायलंडवर नऊ गडी राखून विजय; स्नेह राणा प्लेयर ऑफ द मॅच

बांगलादेशातील महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेतील १९ व्या सामन्यात सोमवारी भारताने थायलंडवर नऊ गडी राखून विजय मिळविला. ४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट‌्स मिळविणाऱ्या स्नेह राणाला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्नेह राणाने ४ षटकांत ९ धावा देत ३ गडी बाद करत प्रथम गोलंदाजीचा निर्णय यशस्वी ठरविला. थायलंड संघ १५.१ षटकात अवघ्या ३७ धावांतच गारद झाला. भारताला जिंकण्यासाठी अवघ्या ३८ धावा करण्याची आवश्यकता होती. भारताने विजयी लक्ष्य ६ षटकांत एक विकेटच्या मोबदल्यात १ बाद ४० धावा करीत साध्य केले.

एकतर्फी झालेल्या या सामन्यात थायलंडच्या केवळ एकाच बॅटरला दुहेरी धावसंख्या करता आली. चार बॅटर्सना भोपळाही फोडता आला नाही. सलामीवीर-यष्टीरक्षक नन्नापट कोंचाओएनकाय हिने १९ चेंडूंत १२ धावा केल्या. तिला दीप्तीने धावबाद केले. स्नेह राणाने फिरकीच्या तालावर थायलंडच्या बॅटर्सना त्रस्त केले. तिला दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रभावीपणे साथ दिली. स्नेहने ४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट‌्स मिळविले. दीप्तीने ४ षटकांत १० धावा देत दोन विकेट‌्स घेतल्या. मागच्या सामन्यातील सामनावीर पूजा वस्त्राकरने दोन षटके टाकत फक्त चार धावा दिल्या. राजेश्वरीने तीन षटकांत ८ धावा देत दोन विकेट‌्स मिळविल्या. मेघना सिंगने २.१ षटके टाकताना सहा धावा देत एक विकेट मिळविली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in