भारताचा झिम्बाब्वेवर १० गडी राखून सहज विजय, मालिकेत १-० ने आघाडी

झिम्बाब्वेचा संघ 40.3 षटकांत 189 धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी तीन बळी घेतले
भारताचा झिम्बाब्वेवर १० गडी राखून सहज विजय, मालिकेत १-० ने आघाडी

भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे संघाचा त्यांच्याच भूमीत १० गडी राखून पराभव केला आहे. भारताने तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा आणि ऑफस्पिनर अक्षर पटेल यांच्यासमोर गुडघे टेकले. भारतीय सलामीवीर शुभमन गिल (नाबाद 82) आणि शिखर धवन (नाबाद 81) या दोघांनी दमदार अर्धशतके झळकावल्यामुळे झिम्बाब्वेचा डाव 189 धावांवर आटोपला आणि संघाला 10 विकेटने विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा संघ 40.3 षटकांत 189 धावांत ऑलआऊट झाला.

भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर, फिरकीपटू अक्षर पटेलच्या खात्यातही तीन विकेट जमा झाल्या. याशिवाय मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. शिखर-शुभमनची अभेद्य भागीदारी १९० धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेले भारताचे सलामीवीर शुभमन आणि शिखर यांनी भारताला अप्रतिम सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी करत भारताला विजयापर्यंत नेले. शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. त्यामुळे भारताने 30.5 षटकांत 192 धावा केल्या. त्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in