वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर पाच विकेट्स राखून विजय;संजू सॅमसनला सामनावीर

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळालेल्या झिम्बाब्वेने ३८.१ षट्कांमध्ये सर्वबाद १६१ धावा केल्या

हरारे स्पोर्ट्स क्लब क्रिकेट मैदानावर शनिवारी झालेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर पाच विकेट्स आणि १४६ चेंडू राखून विजय मिळविला आणि मालिका खिशात घातली. मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. ३९ चेंडूंत नाबाद ४३ धावा आणि तीन महत्त्वपूर्ण झेल टिपणाऱ्या संजू सॅमसनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळालेल्या झिम्बाब्वेने ३८.१ षट्कांमध्ये सर्वबाद १६१ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने २५.४ षट्कांमध्ये ५ बाद १६७ धावा करीत विजयाचे लक्ष्य साध्य केले.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार के एल राहुलच्या दुऱ्याच षट्कातील चौथ्या चेंडूवर अवघी एक धाव करून बाद झाला. या सामन्यात स्वत: सलामीला येण्याचा राहुलचा निर्णय निष्फळ ठरला. मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. त्यानंतर शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी २९ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे या सामन्यातही धवन-गिल जोडी जमणार, असे वाटत असतानाच सातव्या षट्कातील तिसऱ्या चेंडूवर धवनला चिवांगाने बाद केले. कायबाने त्याचा झेल टिपला. २१ चेंडूंत ३३ धावा करून धवन बाद झाला. त्यानंतर ईशान किशन (१३ चेंडूंत ६), शुभमन गिल (३४ चेंडूंत ३३) आणि दीपक हुडा (३६चेंडूंत २५) हे बाद झाले. यष्टिरक्षक संजू सॅमसन (३९ चेंडूंत नाबाद ४३) आणि अक्षर पटेल (७ चेंडूंत नाबाद ६) यांनी भारताला विजय मिळवून दिला.

त्याआधी, भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. झिम्बाब्वेची सुरुवातही निराशाजनक झाली. १२.४ षट्कातच त्यांची अवस्था ४ बाद ३१ अशी दयनीय झाली. त्यानंतर सिन विल्यम्सने ४२ चेंडूंत ४२ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे झिम्बाब्वेचा निभाव लागला नाही. संपूर्ण संघ ३८.१ षट्कांत गारद झाला.

भारताच्यावतीने दीपक चहरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स मिळविल्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २२ ऑगस्ट रोजी हरारे येथेच होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in