टी-२० मालिकेत भारताचे निर्भेळ यश; सामनावीर वैभवची चमक; तिसऱ्या लढतीत झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय, मयांकची पुन्हा प्रभावी गोलंदाजी

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने रविवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ३५ धावांनी पराभव केला. याबरोबरच भारताने मालिकेच ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. वैभव सूर्यवंशी सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
टी-२० मालिकेत भारताचे निर्भेळ यश; सामनावीर वैभवची चमक; तिसऱ्या लढतीत झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय, मयांकची पुन्हा प्रभावी गोलंदाजी
टी-२० मालिकेत भारताचे निर्भेळ यश; सामनावीर वैभवची चमक; तिसऱ्या लढतीत झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय, मयांकची पुन्हा प्रभावी गोलंदाजीX | BCCI
Published on

हरारे : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने रविवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ३५ धावांनी पराभव केला. याबरोबरच भारताने मालिकेच ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. वैभव सूर्यवंशी सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची ८१ धावांची संयमी खेळी आणि मयंक यादवच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ३५ धावांनी पराभव केला. रविवारी झालेल्या या विजयामुळे भारताने तीन सामन्यांची ही मालिका ३-० अशी खिशात घातली. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध ०-४ आणि आयर्लंडविरुद्ध ०-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

हरारे स्पोर्ट्स क्लबच्या काहीशा मंद खेळपट्टीवर १९३ धावांचे लक्ष्य गाठणे झिम्बाब्वेसाठी कठीण आव्हान होते. रायन बर्लने ५४ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली तरी झिम्बाब्वेचा संघ ७ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पॉवरप्लेचा योग्य वापर करण्यात अपयशी ठरल्याने यजमानांनी पुन्हा एकदा लवकर विकेट्स गमावल्या. वेगवान गोलंदाज मयंक यादवने (३/२९) डावाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद करून झिम्बाब्वेला मोठा धक्का दिला. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये यश ठाकूरने (२/४५) सलग दोन चेंडूंवर डिओन मायर्स आणि कर्णधार सिकंदर रझा यांना बाद केल्याने झिम्बाब्वेची ३ बाद ३४ अशी अवस्था झाली. भारतीय खेळाडूंकडून चार झेल सुटले तरी झिम्बाब्वेचे फलंदाज विजयाचे लक्ष्य गाठू शकले नाहीत. रायन बर्लने वेस्ली मधवेरेसोबत (२८) पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या २ धावांवर बाद झाला. त्याच्या गेल्या सहा डावांतील ही आणखी एक निराशाजनक कामगिरी ठरली. मात्र, बिहारच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अत्यंत समजूतदारपणे फलंदाजी केली. त्याने पहिल्या १० चेंडूंत ११ धावा आणि पुढील १० चेंडूंत १५ धावा करत ३१ चेंडूंत आपले दुसरे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूंच्या खेळीत ब्रॅड इव्हान्सच्या यॉर्करवर मारलेला चौकार आणि सिकंदर रझाला मारलेला १०२ मीटर लांब षटकार प्रेक्षणीय ठरला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in