Paris Olympics 2024 : ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ने अभिनव बिंद्रा सन्मानित

भारताचा माजी नेमबाज आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला प्रतिष्ठेच्या ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ने सन्मानित करण्यात आले.
Paris Olympics 2024
‘ऑलिम्पिक ऑर्डर’ने अभिनव बिंद्रा सन्मानित
Published on

पॅरिस : ऑलिम्पिक चळवळीत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल भारताचा माजी नेमबाज आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला प्रतिष्ठेच्या ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्या हस्ते बिंद्राला पुरस्कार देण्यात आला.

बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा बिंद्रा भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. ‘आयओसी’च्या १४२व्या बैठकीत बिंद्राला या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. बिंद्राने एकूण पाच ऑलिम्पिकमध्ये खेळाडू म्हणून सहभाग नोंदवला.

“दोन दशकांहून अधिक काळ मी माझ्या ऑलिम्पिक स्वप्नांचा पाठपुरावा करत होतो. ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळणे हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण होता. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिक चळवळीत राहणे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणे ही माझी आवड होती. या सगळ्या प्रवासाची दखल घेतली गेली याचा आनंद आहे. यापुढेही या चळवळीत स्वत:चे योगदान देत राहेन.” असे बिंद्रा आवर्जून म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in