पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत, सोमवारी १०व्या दिवशी भारताला बॅडमिंटन आणि नेमबाजीत ऐतिहासिक कांस्यपदक पटकावण्याची संधी होती. मात्र दोन्ही ठिकाणी भारताच्या पदरी निराशा पडली. एकीकडे लक्ष्य सेनला संघर्षानंतर बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर नेमबाजीत अनंतजीत सिंग-महेश्वरी चौहान जोडीला अवघ्या एका गुणामुळे पदकापासून दूर रहावे लागले. त्यामुळे भारताच्या खात्यात तूर्तास तीनच पदके जमा असून मंगळवारी, अर्थात आज ११ व्या दिवशी हॉकीत भारतीय संघ निर्णायक उपांत्य लढत खेळणार आहे. तसेच गेल्या ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा अभियानाला प्रारंभ करणार आहे. याशिवाय, कुस्तीमध्ये विनेश फोगट आणि टेबल टेनिसमधील भारताच्या कामगिरीवरही लक्ष असेल. बघूया भारताचे आजचे संपूर्ण वेळापत्रक :
आजचे वेळापत्रक
> ॲथलेटिक्स
भालाफेक प्राथमिक फेरी (पुरुष)
किशोर जेना (अ-गट)
(दुपारी १.५० वा.)
नीरज चोप्रा (ब-गट)
(दुपारी ३.२० वा.)
महिलांची ४०० मीटर शर्यत
किरण पहल (रेपेचेज फेरी)
(दुपारी २.५० वा.)
> टेबल टेनिस
उपउपांत्यपूर्व फेरी (राऊंड ऑफ १६)
भारत वि. चीन (पुरुष)
(दुपारी १.३० वा.)
> कुस्ती
महिलांची उपउपांत्यपूर्व फेरी
विनेश फोगट वि. युई सुसाकी (५० किलो वजनी गट)
(दुपारी ३ वा.)
आगेकूच केल्यास उपांत्यपूर्व लढत सायंकाळी ४.३० वाजता
> हॉकी
पुरुषांचा उपांत्य सामना
भारत वि. जर्मनी
(रात्री १०.३० वा.)
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप