भारताची टी-२० सामन्यांच्या मालिकेत आघाडी;वेस्ट इंडिजवर सात विकेट‌्स राखून विजय

विजयासाठीचे १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९ षट्कांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात साध्य केले.
भारताची टी-२० सामन्यांच्या मालिकेत आघाडी;वेस्ट इंडिजवर सात विकेट‌्स राखून विजय

भारताने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर सात विकेट‌्स राखून विजय मिळवत पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. सलामीवीर म्हणून गौरविण्यात आले.

विजयासाठीचे १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९ षट्कांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात साध्य केले. भारताकडून सलामीवीर सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत ४४ चेंडूंत ७८ धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यर (२७ चेंडूंत २४) आणि ऋषभ पंत (२६ चेंडूंत नाबाद ३३) यांनी शानदार साथ दिली.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने एक षट्कार एक चौकार लगावत पाच चेंडूत ११ धावा केल्या; मात्र एक फटका मारताना त्याचा पाठीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन परतावे लागले.

श्रेयस अय्यरला अकील होसेनने बाराव्या षट्कात चकविले. श्रेयसला थॉमसने यष्टिचीत केले. सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी केली. पंधराव्या षट्कात डॉमिनिक्स ड्रेक्सच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल अल्झारी जोसेफने टिपला. हार्दिक पंड्याला (६ चेंडूंत ४) फार काही करता आले नाही. दीपक हुडाने सात चेंडूंत नाबाद १० धावांची खेळी केली. ऋषभ पंतने (२६ चेंडूंत नाबाद ३३) अखेर चौकार मारत विजय साकार केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in