भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम; जपानला धूळ चारत उपांत्य फेरीत प्रवेश

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने यजमान जपानचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गट 'अ' मधील या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपला सलग चौथा विजय नोंदवला असून, आपली अपराजित मालिका कायम ठेवली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम; जपानला धूळ चारत उपांत्य फेरीत प्रवेश
भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम; जपानला धूळ चारत उपांत्य फेरीत प्रवेशX
Published on: 

काकामिगाहारा : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने यजमान जपानचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गट 'अ' मधील या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपला सलग चौथा विजय नोंदवला असून, आपली अपराजित मालिका कायम ठेवली आहे.

यापूर्वी भारताने इंडोनेशियाचा १३-१, श्रीलंकेचा १६-१ आणि दक्षिण कोरियाचा ८-२ असा मोठा पराभव केला होता. भारतीय संघाचा पुढील सामना २८ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. जपानविरुद्धच्या सामन्यात १५ व्या मिनिटाला अभिषेकने मैदानी गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कोर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. पहिल्या दोन सत्रांत जपानने भारताला कडवी झुंज दिली, परंतु मध्यंतरापर्यंत भारतीय संघाने एका गोलची आघाडी कायम ठेवली होती.

बाद फेरीच्या सामन्यांपूर्वी

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्यासमोर पेनल्टी कोर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याचे मुख्य आव्हान असणार आहे. या सामन्यात भारताला एकूण १० पेनल्टी कोर्नर मिळाले, परंतु त्यापैकी केवळ एकाच संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in