इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; सिंधू मात्र पराभूत
एक्स @himantabiswa

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; सिंधू मात्र पराभूत

भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.
Published on

नवी दिल्ली : भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, तर पुरुष एकेरीत किरण जॉर्ज यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागने कोरियाच्या जीन याँग आणि कँग मिन यांना २१-१०, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये ४१ मिनिटांत धूळ चारली. त्यांची शनिवारी मलेशियाची तिसरी मानांकित जोडी फेई गोह आणि नूर इझुद्दीन यांच्याशी गाठ पडेल.

महिला एकेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काने सिंधूला २१-९, १९-२१, २१-१७ असे पराभूत केले. तसेच पुरुष एकेरीत चीनच्या हाँग वेंगने किरणला २१-१३, २१-१९ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारताचे येथील अभियान संपले.

logo
marathi.freepressjournal.in