भारत-पाकिस्तान सामना वानखेडेवर?

विश्वचषकातील अंतिम लढत वगळता अहमदाबादमध्ये एकही सामना खेळण्यास पीसीबीचा नकार
भारत-पाकिस्तान सामना वानखेडेवर?

कराची : भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकदिवसीय विश्वचषकात होणारा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी अहमदाबादमध्ये एकही लढत खेळण्यास नकार दर्शवला आहे. त्यांनी मुंबईतील वानखेडे, कोलकातामधील ईडन गार्डन्स आणि बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी या तीन स्टेडियमचे पर्याय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सुचवले आहेत.

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगणार असून नियोजित वेळापत्रकानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणे अपेक्षित आहे. मात्र सेठी यांनी पाकिस्तानचा संघ अहमदाबाद येथे एकही लढत खेळणार नाही, अशी भूमिका स्वीकारली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी आयसीसीच्या ग्रेग बार्कले यांना दिले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे सेठी यांनी मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू असे काही पर्याय आयसीसीला सुचवले आहेत. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सामना प्रामुख्याने वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येईल, असे अपेक्षित आहे.

सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच समावेश

पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पाकिस्तानचा संघ विश्वचषकात सहभागी होईल, असेही सेठी यांनी नमूद केले. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान होणाऱ्या आशिया चषकातून भारतासह अन्य संघांनी माघार घेणार असल्याचे सांगितल्यानंतर पाकिस्तानने विश्वचषकात न खेळण्याचे ठरवले होते. मात्र याविषयी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in