भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांनसाठी उडणार झुंबड

स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांना अधिक मागणी असणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांनसाठी उडणार झुंबड

दुबईत २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांची विक्री सोमवार, १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) रविवारी स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीबाबत माहिती दिली. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांना अधिक मागणी असणार आहे.

एसीसीने अधिकृत घोषणेद्वारे सांगितले की, आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची क्षमता सुमारे २५ हजार इतकी आहे. पहिल्याच दिवशी या महामुकाबल्याची सर्व तिकिटे विकली जाण्याची शक्यता आहे.

सर्व सामन्यांची तिकिटे अधिकृत तिकीट भागीदार platinumlist.net वर उपलब्ध आहेत. चाहते या वेबसाइटद्वारे भारत विरुद्ध पाकिस्तानसह सर्व सामन्यांची तिकिटे बुक करू शकतील. भारत आणि पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांना नेहमीच जास्त मागणी असल्याचे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तिकीट विक्रीवरूनही दिसून आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in