भारत-पाकिस्तान ७ ऑक्टोबरला भिडणार

स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने ११ आणि १३ ऑक्टोबर रोजी; तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे
भारत-पाकिस्तान ७ ऑक्टोबरला भिडणार

पुरुष टीम इंडियाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पार पडल्यांनतर आता महिला आशिया चषक स्पर्धा १ ऑक्टोबरपासून बांगलादेशात होणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटू ७ ऑक्टोबर रोजी भिडणार आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्ालादेश, मलेशिया, यूएई आणि थायलंड हे सात संघ सहभागी होणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी ही घोषणा केली.

स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने ११ आणि १३ ऑक्टोबर रोजी; तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ १ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला अभियानाला सुरुवात करेल. या स्पर्धेत ७ ऑक्टोबर रोजी ‘हाय-व्होल्टेज’ सामना होणार आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत.

यानंतर ३ ऑक्टोबरला भारताचा सामना मलेशियाशी; तर ४ ऑक्टोबर रोजी यूएईशी होणार आहे. त्यानंतर ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी सलग सामने होणार आहेत. भारतीय संघ ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी लढल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी यजमान बांगलादेशशी भिडणार आहे. १० ऑक्टोबर रोजी भारताचा सामना थायलंडशी होणार आहे.

महिला आशिया चषक स्पर्धेच्या या आठव्या हंगामात भारत, पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (यूएई), थायलंड आणि मलेशिया हे संघ सहभागी होणार असले, तरी तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये महिला संघ नाही.

पुरुष क्रिकेटसोबतच मागील काही वर्षात महिला क्रिकेटमध्येही अगदी दर्जेदार खेळ होत आहे. जगभरातील महिला क्रिकेटपटूंच्या दमदार कामिगरीमुळे सामने चुरशीचे होत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in