आशिया चषक २०२३ साठी भारत ठरला पात्र

एसीएफ पात्रता फेरीत पॅलेस्टाईनचा विजय भारताच्या पथ्यावर पडला.
आशिया चषक २०२३ साठी भारत ठरला पात्र

आशिया चषक २०२३ साठी भारत पाचव्यांदा पात्र ठरला. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेत उतरण्याची ही पहिलीच वेळ ठराणार आहे. एसीएफ पात्रता फेरीत पॅलेस्टाईनचा विजय भारताच्या पथ्यावर पडला.

आशिया चषक पुढील वर्षी १६ जून ते १६ जुलै दरम्यान चीनमध्ये होणार आहे. २०१९ मध्ये भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी भारत तीनपैकी दोन गट सामन्यांमध्ये पराभूत झाला होता. शेवटच्या स्थानावर राहण्याची नामुष्की टीम इंडियावर ओढवली होती.

ब गटातील मंगळवारी झालेल्या शेवटच्या पात्रता सामन्यात पॅलेस्टाईनने फिलिपाइन्सचा ४-० असा पराभव केल्याने भारताला शेवटचा सामना न खेळताच आशिया चषकासाठी पात्रता मिळाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in