भारताने आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा - रवी शास्त्री यांचे मत

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे
भारताने आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा - रवी शास्त्री यांचे मत
Published on

भारताने विशेषत: फलंदाजीत आपला आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवावा, असे मत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, आक्रमक पवित्रा हाच यशाचा योग्य मार्ग आहे. काही सामने गमवावे लागले, तरी सामने जिंकण्यास एकदा का सुरुवात झाली की, आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या सामन्यांमध्ये उपयुक्त ठरतो.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंनी आपले फोन बंद करावेत, असा सल्ला शास्त्री यांनी खेळाडूंना दिला. शास्त्री म्हणाले की, त्याने आपल्या मेहनतीवर अवलंबून राहावे, सामन्यात कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची गरज नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान दुबईतील याच मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता.

logo
marathi.freepressjournal.in