Women’s World Cup : सहाव्या गोलंदाजाचा पर्याय भारत स्वीकारणार? तगड्या ऑस्ट्रेलियाशी आज लढत; महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

महिला भारतीय विश्वचषक स्पर्धेत महिलांचा सामना रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात भारत गोलंदाजीचे सहा पर्याय उपलब्ध करण्याची शक्यता आहे.
Women’s World Cup : सहाव्या गोलंदाजाचा पर्याय भारत स्वीकारणार? तगड्या ऑस्ट्रेलियाशी आज लढत; महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
Photo : X (ICC)
Published on

विशाखापटणम : महिला भारतीय विश्वचषक स्पर्धेत महिलांचा सामना रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात भारत गोलंदाजीचे सहा पर्याय उपलब्ध करण्याची शक्यता आहे.

गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताने हातचा सामना गमावला. या सामन्यात ५ गोलंदाजांना घेऊन खेळण्याची भारताची मर्यादा उघड झाली.

सहाव्या गोलंदाजाच्या अनुपस्थितीत कर्णधार हरमनप्रीत कौरने फिरकी गोलंदाजीचा पर्याय पुढे आणला. ४० व्या षटकानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांवर हल्लाबोल करत यजमान संघाला धूळ चारली.

अखेरच्या षटकांत क्रांती गौड आणि अमनजोत कौर यांनी १२ चेंडूंत ३० धावा मोजल्या. दक्षिण आफ्रिकेने २५२ धावांचे लक्ष्य ४८.५ षटकांत पार केले.

सध्या भारताच्या ताफ्यात उजव्या हाताचे दोन वेगवान गोलंदाज (गौड, कौर), दोन फिरकीपटू (दिप्ती शर्मा, स्नेह राणा) आणि डावखुरी फिरकीपटू (श्री चरणी) यांचा समावेश आहे.

एसीए व्हीडीसीए स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल तर तगड्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करून दबाव आणतील.

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत सहाव्या गोलंदाजाची आवश्यकता आहे. ॲश्ले गार्डनर, एलिसा हेली, एलिस पेरी यांसारख्या ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजांसमोर हरमनप्रीतच्या पार्टटाइम फिरकी गोलंदाजाचा टिकाव लागण्याची शक्यता कमी आहे. परंतु सहाव्या गोलंदाजाची निवड करणे सोपे नाही.

भारतासमोर गोलंदाजीचा पर्याय

गत सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेची नादीन डी क्लार्क म्हणाली की, पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांवर आक्रमण केले. परंतु फिरकी गोलंदाजांना मैदानाची काहीशी साथ मिळाली. त्यामुळे यजमान संघ अतिरिक्त सहाव्या गोलंदाजाला संधी देण्याची शक्यता आहे. डावखुरी फिरकीपटू राधा यादवला संघात स्थान मिळू शकते. ती फलंदाजीही करू शकते. राणाच्या जागी राधा यादवला संघात संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाकडे दोन डावखुरे फलंदाज आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डावखुऱ्या बेथ मुनीने शतक झळकावले होते. तसेच सलामीवीर फोएबे लिचफिल्डही ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात आहे. त्यामुळे भारत कदाचित दोन उजव्या हाताच्या फिरकीपटूंना संधी देऊ शकतो. भारत अमरजोत कौरऐवजी वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीचा पर्याय स्विकारू शकतो. पण त्यामुळे तळातील फलंदाजी कमजोर होण्याची भीती आहे. हरलीन देओलऐवजी राधा यादवलचा संघात समावेश करण्याचा विचार भारत करू शकतो. पण त्यामुळे आधीच खराब कामगिरी करत असलेल्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजीला धक्का बसू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in