
भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर पार पडला. उत्तम फलंदाजी आणि नंतर भक्कम गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना 56 धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करत 179 धावा केल्या. यानंतर नेदरलँड्सच्या संघाला १२३ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले, त्यामुळे भारताने ५६ धावांनी सामना जिंकला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून नेदरलँडला अधिक धावा करू दिल्या नाहीत. या विजयासह भारताने गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.