संजू की वैभव? भारतासमोर निवडीचा पेच; अफगाणिस्तानच्या फिरकी आव्हानासाठी भारतीय संघ सज्ज, उभय संघात पहिला टी-२० सामना आज

विरुद्ध अफगाणिस्तान रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतासमोर सलामीच्या फलंदाजाची निवड करताना मोठा पेच निर्माण झाला आहे.
संजू की वैभव? भारतासमोर निवडीचा पेच; अफगाणिस्तानच्या फिरकी आव्हानासाठी भारतीय संघ सज्ज, उभय संघात पहिला टी-२० सामना आज
संजू की वैभव? भारतासमोर निवडीचा पेच; अफगाणिस्तानच्या फिरकी आव्हानासाठी भारतीय संघ सज्ज, उभय संघात पहिला टी-२० सामना आज(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : विरुद्ध अफगाणिस्तान रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतासमोर सलामीच्या फलंदाजाची निवड करताना मोठा पेच निर्माण झाला आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्या आक्रमक खेळाला पसंती द्यायची की संजू सॅमसन याच्या अनुभवावर विश्वास दाखवायचा, असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.

इंग्लंड दौऱ्यात सॅमसनच्या जागी सूर्यवंशीला खेळवण्यात आले होते, परंतु मालिकेतील शेवटच्या सामन्यात सॅमसनचे संघात पुनरागमन झाले होते. जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनाही समान संधी देण्याचा प्रयत्न करू शकतात. शुक्रवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान सूर्यवंशीने वेगवान मारा कसा खेळायचा याचे धडे जसप्रीत बुमराकडून घेतले, तर सॅमसन चांगल्या लयीत दिसला. शुक्रवारी सराव सत्रादरम्यान यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनच्या पाठीला दुखापत झाली होती. जर किशन या सामन्यातून बाहेर पडला, तर सूर्यवंशी आणि सॅमसन हे दोघेही अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळताना दिसू शकतात. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात २७० आणि ८० धावांची दमदार खेळी करणारा किशन टी-२० फॉरमॅटमधील आपली जागा गमावू इच्छिणार नाही. आशियाई खेळांच्या

पूर्वतयारीसाठी राशिद खान, नूर अहमद आणि मुजीब उर रहमान या फिरकीपटूंचा समावेश असलेल्या पूर्ण क्षमतेच्या अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळणे भारतासाठी उत्तम संधी ठरेल. तसेच फजलहक फारूकी, नवीन उल-हक आणि अष्टपैलू गुलबदिन नायब, अझमतुल्लाह ओमरझाई यांचा समावेश असलेला अफगाणिस्तानचा वेगवान सामन्यानंतर मारा डीपीएलच्या थकलेल्या कोटलाच्या भारतीय फिरोजशाह खेळपट्टीवर फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतो.

भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या गंभीर यांच्या धोरणानुसार अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा अंतिम ११ मध्ये समावेश निश्चित मानला जात आहे. तिसरा फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्तीला संधी मिळते की, यश ठाकूर या अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला खेळवले जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

तिसरा फिरकीपटू की वेगवान गोलंदाज?

भारताच्या अंतिम संघरचनेत तिसरा स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्तीला संधी मिळणार की विशेषज्ञ वेगवान गोलंदाज यश ठाकूरवर विश्वास दाखवला जाणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंग यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असून, अष्टपैलू नितीशकुमार रेडीचे स्थानही पक्के आहे.

प्रतिस्पर्धी संघ

अफगाणिस्तान : इब्राहिम झादरान (कर्णधार), दार्विश रसुली, नूर अल रहमान, रहमानुल्ला गुरबाझ, सेदीकुल्ला अटल, अझमतुल्ला ओमरझाई, रशिद खान, मोहम्मद नबी, गुलबदीन नईब, नांगेलिया खारोटे, अब्दुल्ला अहमदझाई, फझलहक, फारूखी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान, नूर अहमद.

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, यश ठाकूप, वरुण चक्रवती, रवी बिश्णोई.

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in