आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धा : भारतापुढे आज जपानचे आव्हान

सलामीच्या लढतीतील अटीतटीच्या विजयानंतर भारतीय संघाला आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेच्या 'अ' गटात रविवारी धोकादायक वाटणाऱ्या जपानशी दोन हात करायचे आहेत.
Photo - PTI
Photo - PTI
Published on

राजगीर (बिहार) : सलामीच्या लढतीतील अटीतटीच्या विजयानंतर भारतीय संघाला आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेच्या 'अ' गटात रविवारी धोकादायक वाटणाऱ्या जपानशी दोन हात करायचे आहेत.

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सातव्या स्थानी आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने २३ व्या स्थानी असलेल्या चीनवर ४-३ असा रोमहर्षक विजय मिळवला. आगामी वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत भारत प्रबळ दावेदार मानला जातो.

चीनविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताने चांगली सुरुवात केली होती, पण नंतर केलेला गचाळपणा अंगाशी आला होता. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात सतर्क राहणे गरजेचे आहे.

जपानने सलामीच्या सामन्यात कझाकस्तानविरुद्ध ७ गोल्स झळकावले होते. त्यामुळे मजबूत अशा जपानी आक्रमणासमोर भारताच्या बचावफळीला सतर्क राहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in