गुवाहाटी : डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा (२० चेंडूंत नाबाद ६८ धावा) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (२६ चेंडूंत नाबाद ५७ धावा) यांनी रविवारी चौकार-षटकारांचा धूमधडाका केला. त्यामुळे भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल ८ गडी व ६० चेंडू राखून फडशा पाडला. भारताने १५४ धावांचे लक्ष्य अवघ्या १० षटकांत गाठून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ४ षटकांत १७धावांत ३ बळी मिळवणारा जसप्रीत बुमरा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र भारताने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करताना १० षटके राखून विजय मिळवला. अभिषेकने २० चेंडूंत ६८ धावा फटकावताना ७ चौकार व ५ षटकार लगावले. त्याने १४ चेंडूंत अर्धशतकही साकारताना भारताकडून टी-२०तील दुसरे वेगवान अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन शून्यावरच माघारी परतल्यावर अभिषेक व इशान किशनने (१३ चेंडूंत २८) दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली.
मग किशन बाद झाल्यावर सूर्यकुमारच्या साथीने अभिषेकने तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारने ६ चौकार व ३ षटकारांसह सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने टी-२० कारकीर्दीतील सातवे अर्धशतक साकारले. पहिल्या सामन्यात त्याने ८४ धावा फटकावलल्या होत्या.
विश्वचषकाच्या दृष्टीने भारताची उत्तम तयारी सुरू आहे, असे म्हणता येईल. तत्पूर्वी, ग्लेन फिलिप्सच्या ४८ धावांच्या झुंजीमुळे किवी संघाने ए किमान १५० धावांचा पल्ला गाठला. बुमराने कर्णधार मिचेल सँटनर (२७), कायले जेमिसन, २ टिम सेईफर्ट यांचे बळी मिळवले. तसेच फिरकीपटू रवी बिश्नोईने १८ धावांत २ बळी मिळवताना फे फिलिप्स व मार्क चॅपमन (३२) यांना माघारी पाठवले. हार्दिक पंड्याने २, तर हर्षित राणाने १ बळी २ मिळवला. या खेळपट्टीवर किमान १८० धावांची गरज होती. मात्र उं भारताने ज्याप्रकारे धावांचा पाठलाग केला, ते पाहता २०० धावाही कमी पडल्या असत्या.
मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी यूझीलंड विश्वचषक स्पर्धेची मालिका न्यूझीलंडचा संघ सध्या आहे. पूर्वपरीक्षा भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. मात्र आता लक्ष टी-२० सामन्यांकडे वळले आहे. भारतीय संघ न्यूझीलंडशी अनुक्रमे सामने खेळणार आहे. मग ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ९ बाद १५३ (ग्लेन फिलिप्स ४८, मार्क चॅपमन ३२; जसप्रीत बुमरा ३/१७, रवी बिश्नोई २/१८) पराभूत वि.
भारत : १० षटकांत २ बाद १५५ (अभिषेक शर्मा नाबाद ६८, सूर्यकुमार यादव नाबाद ५७, इशान किशन २८)
सामनावीर : जसप्रीत बुमरा