

बर्मिंगहॅम (पीटीआय) : पाकिस्तानशी पडणार आहे. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी समतोल कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला या सामन्यात चांगली सुरुवात करण्यासाठी खेळीची अपेक्षा आहे. सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्याकडून मोठ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गेल्या वर्षी मिळालेल्या ५० षटकांच्या एकदिवसीय विश्वविजेतेपदानंतर आता दुसरे जागतिक जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजवरचे आकडे पूर्णपणे भारताच्या बाजूने राहिले आहेत. टी-२० प्रकारात भारताने
पाकिस्तानविरुद्ध १३-३ अशी मोठी आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघांची शेवटची लढत २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दुबईत झाली होती, जिथे भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवला वा होता. वर्ल्डकपच्या पूर्वतयारीत भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ आणि इंग्लंडचा ३-२ ने त्यांच्याच भूमीत पराभव केला आहे, तर श्रीलंकेला मायदेशात ५-० ने धूळ चारली आहे. मात्र, या प्रवासात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ४-१ आणि इंग्लंडकडून २-१ ने पराभवही स्वीकारावा लागला होता.
भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यासाठी उपकर्णधार स्मृती आणि शफाली यांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल. मानधनाने फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२ धावांची खेळी केल्यानंतर पुढील ६ सामन्यांत १३, १२, ३७, ०, ३२ आणि ८ अशा कमी धावा केल्या आहेत. शफालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा - केल्यानंतर पुढील पाच डावांत - केवळ ९, ४, २, २२ आणि ११ धावा केल्या आहेत. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाला शनिवारी सराव करताना दुखापत झाल्यामुळे तिच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. २४ वर्षीय फातिमा सना सध्या उत्कृष्ट फॉर्मात असून तिची फलंदाजीत ५० पेक्षा जास्त सरासरी आणि गोलंदाजीत २५ पेक्षा कमी सरासरी आहे. तिने नुकतेच झिम्बाब्वेविरुद्ध कराचीत अवघ्या १५ चेंडूंत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले होते.
भारताच्या गोलंदाजी आक्रमणात दुखापतग्रस्त अमनजोत कौर आणि काशवी गौतम यांची कमतरता भासेल. हरमनप्रीतव्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि भारती फुलमाळी यांच्यावरही धावांचा वेग राखण्याची जबाबदारी असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयांका पाटील आणि राधा यादव.
पाकिस्तान : फातिमा सना (कर्णधार), गुल फेरोझा, आयेशा झफर, इराम जावेद, इयमन फातिमा, अलिया रियाझ, नतालिया परवेझ, सायरा जबीन, मुनीबा अली, टुबा हसन, रामीन शामीम, सादिया इक्बाल, नाशरा संधू, डायना बेग, तास्मिया रुबाब.
सामन्याची वेळ : संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून.