भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका : लढत रद्द, मालिका बरोबरीत

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारी रात्री झालेला पाचवा टी-२० सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ लढती जिंकल्यामुळे ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका : लढत रद्द, मालिका बरोबरीत
भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका : लढत रद्द, मालिका बरोबरीतX
Published on: 

बेंगळुरू : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारी रात्री झालेला पाचवा टी-२० सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ लढती जिंकल्यामुळे ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

आधीच पावसामुळे ही लढत ९ वाजता सुरू झाली. प्रत्येकी ९ षटकांचा सामना खेळवण्याचे त्यावेळी ठरवण्यात आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरुवात करताना ७.४ षटकांत ५ बाद ११८ धावा केल्या. किशनने १० चेंडूंत ३०, तर नमनने ६ चेंडूंत २४ धावा फटकावल्या.

मात्र आठव्या षटकात पुन्हा पावसाचे आगमन झाले. त्यानंतर अर्धा तास प्रतीक्षा करूनही पाऊस न थांबल्याने अखेरीस पंचांना सामना रद्द झाल्याचे घोषित करावे लागले. श्रेयस अय्यर व शाय होप या दोन्ही कर्णधारांनी मग मालिकेचा चषक स्वीकारला. होपच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने दोन शतके साकारली होती. याप्रकारे विंडीजचा भारत दौरा संपला. एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली, तर टी-२० मालिका बरोबरीत सुटली. आता भारतीय संघ न्यूझीलंडला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in