India vs Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर ५ धावांनी विजय

या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूत 50 धावा केल्या
India vs Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर ५ धावांनी विजय

टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत सुरु भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. मात्र काही वेळातच सामन्याला सुरुवात झाली आणि भारताने बांग्लादेशचा ५ धावांनी पराभव केला. भारताची फलंदाजी होऊन भारतानं 185 धावांचं टार्गेट बांग्लादेशसमोर ठेवले होते. दरम्यान बांग्लादेशच्या 7 ओव्हर्स खेळून झाल्यावर पाऊस आला, ज्यानंतर 16 ओव्हर्सचा खेळ कऱण्यात आला. 

उपांत्य फेरीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. त्याने बाद होण्यापूर्वी 8 चेंडूत 2 धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्याला विराट कोहलीने चांगली साथ दिली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतक झळकावले. पण शाकिबने त्याला अर्धशतकानंतर बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 30 धावांची आक्रमक खेळी केली. विराटने नाबाद ६४ धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी घेतले.  

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in