
युवा विश्व चॅम्पियन अलफिया पठान आणि गीतिका यांनी चमकदार कामगिरी करत कजाखस्तानच्या नूर सुल्तान येथे सुरू असलेल्या एलोर्डा कप बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये सुवर्णपदक पटकाविले. जमुना बोरो आणि कलाइवानी श्रीनिवासन यांना मात्र रौन्य पदकावरु समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दहा कांस्य पदक यासह १४ पदकांची कमाई केली. अलफियाने २०१६ ची विश्व चॅम्पियन लझ्झत कुंगेइबायेवा हिला महिलांच्या ८१ किलो वजनी गटात ५-० ने नमविले. गीतिकाने कलाइवानी हिला महिलांच्या ४८ किलो वजनी गटात ४-१ ने पराभूत केले.
दोघींना या विजयामुळे ७०० डॉलर्सचो बक्षिस मिळाले. कांस्य पदक विजेत्यांना चारशे डॉलर्स, तर कांस्य पदक विजेत्यांना दोनशे डॉलर्सचे बक्षीस मिळाले.
जमुनाला उजबेकिस्तानच्या नाइजिना उक्तामोवाने ५४ किलो वजनी गटात ५-० ने नमविले.