एएफसी आशियाई चषक स्पर्धेत भारताचा विजय

भारताकडून कर्णधार सुनील छेत्रीने ८६ व्या मिनिटाला आणि सहल अब्दुल समदने ९१ व्या मिनिटाला गोल डागला.
एएफसी आशियाई चषक स्पर्धेत भारताचा विजय

एएफसी आशियाई चषक स्पर्धेत कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर २-१ ने विजय मिळविला. एका मागून एक सामन्यावर भारतीय संघ फॉर्मात असून एकापाठोपाठ एक विजयाची नोंद करीत आहे.

या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्रीने ८६ व्या मिनिटाला आणि सहल अब्दुल समदने ९१ व्या मिनिटाला गोल डागला.

‘ड’ गटात भारत दुसऱ्या क्रमांकावर

या विजयासह भारतीय संघ स्पर्धेतील ‘ड’ गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला. भारताने खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. हाँगकाँगचा संघ पहिल्या स्थानावर आहे. दोघांच्या खात्यात प्रत्येकी सहा गुण आहेत; मात्र गोल फरकाच्या बाबतीत हाँगकाँगचा संघ पुढे आहे.

कंबोडियावर २-० असा विजय मिळवून भारतीय संघाने प्रवासाला सुरुवात केली. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने दुहेरी गोल केला. एक गोल पेनल्टीवर तर दुसरा मैदानी गोल होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in