
चंदिगड : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ शनिवारी मुल्लानपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. उभय संघांतील ३ लढतींची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीवर आहे. त्यामुळे या मालिकेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात २८२ धावांचे लक्ष्य ४४ षटकांतच गाठून ८ गडी राखत दमदार विजय नोंदवला. भारताला क्षेत्ररक्षण आणि फिरकी गोलंदाजी यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. दुसऱ्या लढतीत स्मृती मानधनाच्या शतकाच्या बळावर भारताने कांगारूंना १०२ धावांच्या फरकाने धूळ चारली. त्यामुळे विश्वचषकाच्या दृष्टीने आता तिसरी लढत जिंकणे गरजेचे आहे.