भारतीय महिला संघाची आजपासून पर्थ येथे गुलाबी कसोटी; ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीचा कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.
भारतीय महिला संघाची आजपासून पर्थ येथे गुलाबी कसोटी; ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीचा कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना
Published on

पर्थ : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने उभय संघांतील ही लढत खेळवण्यात येणार असून ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीच्या कारकीर्दीतील हा अखेरचा सामना असेल.

नोव्हेंबर महिन्यात भारताने मुंबईत ऐतिहासिक महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले. त्यानंतर श्रीलंकेला भारताने टी-२० मालिकेत धूळ चारली. तसेच फेब्रुवारीत महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व उत्साहात पार पडले. स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा डब्ल्यूपीएलचे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची किमया साधली.

आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असून या दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने २-१ असे यश संपादन केले. मात्र एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला ३-० अशी धूळ चारली. आता ६ ते ९ मार्च या कालावधीत उभय संघांत एकमेव डे-नाइट टेस्ट म्हणजेच गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील कसोटी पर्थ स्टेडियमवर खेळवण्यात येईल. हा दौरा संपल्यानंतर एप्रिलमध्ये भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. जर्स बंगळुरूने यंदा डब्ल्यूपीएलचे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची किमया साधली.

आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असून या दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने २-१ असे यश संपादन केले. मात्र एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला ३-० अशी धूळ चारली. आता ६ ते ९ मार्च या कालावधीत उभय संघांत एकमेव डे-नाइट टेस्ट म्हणजेच गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील कसोटी पर्थ स्टेडियमवर खेळवण्यात येईल. हा दौरा संपल्यानंतर एप्रिलमध्ये भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.

भारतीय संघाची भिस्त फलंदाजीत हरमनप्रीत, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर आहे. तसेच गोलंदाजीत काशवी गौतम व क्रांती गौड या वेगवान जोडीवर भारताची मदार असेल. रेणुका सिंग दुखापतीमुळे या लढतीस मुकणार आहे. रिचा घोष व शफाली वर्मा असे युवाही भारताच्या ताफ्यात आहेत.

दुसरीकडे हिलीने एकदिवसीय कारकीर्दीचा शेवट शतकाने केल्यावर आता कसोटीतही ती छाप पाडण्यास सज्ज असेल. त्याशिवाय बेथ मूनी, फीबी लिचफील्ड, डार्सी ब्राऊन, गार्डनर असे खेळाडू कांगारूंकडे आहेत. एलिस पेरी व जॉर्जिया वॉल यांची कामगिरीही निर्णायक ठरेल.

वेळ : सकाळी १०.५० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

logo
marathi.freepressjournal.in