भारत-ऑस्ट्रेलिया महिला मालिका : पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघ पराभूत

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
भारत-ऑस्ट्रेलिया महिला मालिका : पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघ पराभूत
Photo : X
Published on

मुल्लानपूर : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. फोबे लिचफिल्ड (८८ धावा), बेथ मुनी (नाबाद ७७ धावा) आणि ॲनाबेल सदरलँड (नाबाद ५४ धावा) यांनी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया महिला संघाला ८ विकेट राखून सोपा विजय मिळवून दिला.

पराभवामुळे भारताच्या प्रतीका रावल (६४ धावा), स्मृती मानधना (५८ धावा) आणि हर्लीन देओल (५४ धावा) यांची अर्धशतके व्यर्थ गेली. विजयामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. १७ तारखेला दुसरी लढत खेळवण्यात येईल.

नाणेफेकीचा कौल जिंकून भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतीका आणि स्मृती यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. सलामीच्या या जोडीने भारतीय धावफलकावर नाबाद शतक झळकावले. ११४ धावांवर सलामीची ही जोडी फुटली. वनडाऊन फलंदाजीला आलेल्या हर्लीननेही अर्धशतक झळकावत धावसंख्या पुढे नेली. भारताने निर्धारित ५० षटकांत ७ फलंदाज गमावून २८१ धावा केल्या.

प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला तुलनेने चांगली सुरुवात मिळाली नसली तरी फोबे लिचफिल्डने संघाची धावसंख्या पुढे नेली. बेथ मुनी आणि अनाबेल सदरलँड यांनीही अर्धशतके केली.

logo
marathi.freepressjournal.in