टेबल टेनिसमध्ये भारताने आणखी एक पदक पटकावले

पॉल ड्रिंकहॉल व लिएम पिचफोर्ड यांनी भारतीय जोडीला कडवी झुंज दिली.
टेबल टेनिसमध्ये भारताने आणखी एक पदक पटकावले

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी दहाव्या दिवशी टेबल टेनिसमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले. अचंता शरथ कमल आणि जी साथियान यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत या जोडीला इंग्लंडच्या पॉल ड्रिकहॉल आणि लियाम पिचफोर्ड या जोडीने त्यांना ११-८, ८-११, ३-११, ११-७, ४-११ ने पराभूत केले.

पॉल ड्रिंकहॉल व लिएम पिचफोर्ड यांनी भारतीय जोडीला कडवी झुंज दिली. भारतीय जोडीने पहिला गेम जिंकला, परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी पुढील दोन गेम जिंकून सामन्यात २-१अशी आघाडी घेतली. चौथ्या निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने ११-७ असा विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. इंग्लंडच्या खेळाडूंनी ८-४ अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या जोडीने ११-४ असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in