जागतिक यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला दोन रौप्यपदके मिळाली

जागतिक यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला दोन रौप्यपदके मिळाली

आकाक्षांने एकूण १२७ किलो (५९ अधिक ६८) वजन उचलले, तर विजयने १७५ किलो (७८ अधिक ९७) वजन उचलले.
Published on

मेक्सिकोमधील लिऑन येथे सुरू असलेल्या जागतिक यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रविवारी भारताला दोन रौप्यपदके मिळाली. मनमाडची खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४० किलो वजनी गटात ऐतिहासिक कामगिरी करत भारताला रौप्यपदक मिळवून दिले, तर ४९ किलो वजनी गटात विजय प्रजापतीने रौप्यपदक पटकाविले.

आकाक्षांने एकूण १२७ किलो (५९ अधिक ६८) वजन उचलले, तर विजयने १७५ किलो (७८ अधिक ९७) वजन उचलले.

दरम्यान, अवघ्या १५ वर्षांची असलेली आकांक्षा सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाची साथ यामुळे जागतिक पातळीवर पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे. तिला सक्षम करणारे तिचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in