यंदा जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताची पाटी कोरीच

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यंदा भारताची पाटी कोरीच राहिली. तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारताच्या अन्य खेळाडूंनीही निराशा केली. त्यामुळे भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले.
यंदा जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताची पाटी कोरीच
Photo : X (Neeraj Chopra)
Published on

टोकियो : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यंदा भारताची पाटी कोरीच राहिली. तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारताच्या अन्य खेळाडूंनीही निराशा केली. त्यामुळे भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले.

यंदा १३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत टोकियो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताचे १९ खेळाडू सहभागी झाले होते. दर दोन वर्षांनी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा जागतिक स्पर्धेचे २०वे पर्व होते. २०२३मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने एकमेव सुवर्णदपदकासह १८वा क्रमांक मिळवला होता. नीरजनेच भारतासाठी ते सुवर्ण जिंकले होते. यंदा भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे नीरज विरुद्ध पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम यांच्यातील जुगलबंदी म्हणून पाहिले जात होते. मात्र नीरजला चक्क आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्या तुलनेत सचिन यादवने चौथे स्थान मिळवून भविष्यातील आशा निर्माण केल्या.

अन्य क्रीडा प्रकारांत भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारेने अंतिम फेरी गाठली, मात्र तोही पदकापासून वंचित राहिला. भालाफेकपटू अन्नू राणी, धावपटू गुलवीर सिंग, लांब उडीपटू मुरली श्रीशंकर यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यामुळे २०१९ येथील दोहा जागतिक स्पर्धेनंतर भारताला पुन्हा एकदा एकही पदक जिंकता आले नाही. यापूर्वी, २०२२मध्ये भारताने रौप्य, तर २०२३मध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी मात्र भारताच्या पदरी निराशा पडली.

logo
marathi.freepressjournal.in