World Boxing Championship : महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये डबल धमाका; स्वीटी बुराने जिंकले सुवर्णपद

बॉक्सर नीतू घंघासनंतर आज शनिवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३मध्ये (World Boxing Championship) स्वीटी बुराने (Saweety Boora) सुवर्णपद जिंकले
World Boxing Championship : महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये डबल धमाका; स्वीटी बुराने जिंकले सुवर्णपद
Published on

आज शनिवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Boxing Championship) भारतीयांसाठी २ आनंदाच्या बातम्या आल्या. आधी ४८ किलो वजनी गटात नीतू घंघासने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर ८१ किलो वजनी गटामध्ये स्वीटी बुराने (Saweety Boora) सुवर्ण पदक जिंकले. तिने चीनची बॉक्सर वांग लीनाचा पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे आज महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डबल धमाका पाहायला मिळाला.

महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वीटी बुराने ८१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग लीनाचा ४ - ३ असा पराभव केला. हा सामना अटीतटीचा झाला. नीतू घंघासने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर सर्वांचेच लक्ष या सामान्याकडे होते. दरम्यान, रविवारी होणाऱ्या सामन्यांमध्ये भारताला आणखी २ पदके मिळण्याची शक्यता आहे. कारण, रविवारी निखत जरीन आणि लवलीना बोरहेगनच्या सामन्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दोघींकडूनही भारतीयांना सुवर्णपदाची अपेक्षा आहेत.

logo
marathi.freepressjournal.in