Prithvi Shaw : पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून गोंधळ; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी घेण्यावरुन गोंधळ झाला.
Prithvi Shaw : पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून गोंधळ; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Published on

मुंबईमधील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी घेण्यावरून वाद झाला. यानंतर सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या काही लोकांनी त्याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र मुंबईच्या सहारा स्टार हॉटेलच्या मेंशन क्लबमध्ये गेले होते. त्यावेळी २ व्यक्तींनी पृथ्वी शॉकडे क्लबजवळ सेल्फी घेण्याचा आग्रह केला. एकदा सेल्फी घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सेल्फी घेण्याची मागणी केली पण पृथ्वी शॉने नकार दिला. त्या व्यक्तींनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने दोघानांही बाहेर काढले. त्यानंतर त्या दोन व्यक्तींनी पृथ्वी शॉची गाडी समजून त्याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. या गाडीचा पाठलाग करत त्यांनी जोगेश्वरी लिंक रोडजवळ गाठले. त्या दोन्ही व्यक्तींनी गाडीच्या काचा फोडल्या.

त्या गाडीमध्ये पृथ्वी शॉ नाही हे कळल्यानंतर त्याच्या मित्राला प्रकरण दाबण्यासाठी धमकी दिली. मात्र, या घटनेनंतर पृथ्वी शॉच्या मित्राने ओशिवारा पोलीस ठाणे गाठले आणि त्या ८ जणांविरोधात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉचा तो मित्र एक व्यापारी आहे. त्याने ओशिवारा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सपना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यासह ६ जणांविरोधात आयपीसीच्या कलम ३८४,१४३, १४८,१४९, ४२७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in