पहिल्या सामन्याच्या वेळेमुळे भारतीय चाहते झाले नाराज

पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे.
पहिल्या सामन्याच्या वेळेमुळे भारतीय चाहते झाले नाराज

भारत आणि इंग्लंड यांच्यात उथॅम्प्टन येथे होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या वेळेमुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. याशिवाय, सामन्याचे प्रसारकही अंसंतुष्ट असल्याचे चित्र आहे.

पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना साधारण तीन वाजेपर्यंत जागे रहावे लागणार आहे. त्यामुळे जाहिरातदार, प्रसारक आणि भारतीय क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. सहसा भारतीय क्रिकेट संघाचे सामने भारतीय वेळेनुसार आणि चाहत्यांच्या सोयीनुसार आयोजित केले जातात. पण, भारत विरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या टी-२० सामन्याबाबत असे झाले नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. टी-२० मालिकेचे भारतातील अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क देखील पहिल्या सामन्याच्या वेळेबद्दल समाधानी नसल्याचे सांगण्यात येते. या वेळेमुळे जाहिरातदार स्वारस्य दाखवणार नाहीत आणि याचा फटका प्रसारकांना बसेल, असे बोलले जात आहे. दरम्यान, मालिकेतील दुसरा टी-२० सामना ९ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे संध्याकाळी ७ वाजता होईल. तिसरा टी-२० सामना १० जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. हा सामना देखील संध्याकाळी ७ वाजल्यापासून भारतीय वेळेनुसार होणार आहे. दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी दोन हात करतील. एकदिवसीय मालिकेतील सामने १२, १४ आणि १७ जुलै रोजी होणार आहेत. पहिले दोन एकदिवसीय सामने दिवस-रात्र असतील आणि ते भारतीय वेळेनुसार ५.३० वाजता सुरू होतील. तिसरा टी-२० सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३-३० वाजता होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in