भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी ‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ नावाची एक छोटी मालिका जारी करून जागतिक फुटबॉलचे नियंत्रण करणाऱ्या ‘फिफा’ने छेत्रीचा सन्मान केला आहे.
‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ नावाची मालिका तीन भागात असून FIFA+ वर उपलब्ध आहे. भारताचा कर्णधार सुनीलने आपल्या देशासाठी अनेक गोलची नोंद केली आहे. सध्या तो क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये तिसरा सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला आहे. ‘फिफा’ने खेळाडूच्या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी ‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ नावाची एक छोटी मालिका जारी केली आहे. गोल स्कोअरिंगमुळे छेत्री हा फुटबॉलमधील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या यादीत रोनाल्डो ११७ गोलसह अव्वल स्थानावर आहे. मेस्सी ९० गोलसह दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील छेत्री ८४ गोलसह तिसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीने भारतीय संघासाठी १३१ सामने खेळून ८४ गोल केले आहेत.