भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

भारताच्या पुरुष आणि महिला रिले संघाने सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवली. दोन्ही संघांनी जागतिक अॅथलेटिक्स रिले स्पर्धेत आपापल्या पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवले.
पॅरिस ऑलिम्पिक
पॅरिस ऑलिम्पिकपॅरिस ऑलिम्पिक

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष आणि महिला रिले संघाने सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवली. दोन्ही संघांनी जागतिक अॅथलेटिक्स रिले स्पर्धेत आपापल्या पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवले.

बहामास येथे झालेल्या महिलांच्या पात्रता फेरीत ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या रिले शर्यतीत रुपल चौधरी, एम. आर. पूवमा, ज्योतिका दांडी व शुभा वेंकटेशन यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ३ मिनिटे २९.३५ सेकंद अशी वेळ नोंदवली. जमैकाच्या चौघींनी ३ मिनिटे २८.५४ सेकंद अशी वेळ नोंदवून अग्रस्थान काबिज केले. भारत आणि जमैकासह आघाडीच्या चौघांनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.

पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनास, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ३ मिनिटे ०३.२३ सेकंदांत शर्यत पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले. अमेरिकेने २ मिनिटे ५९.९५ सेकंदांत हे अंतर गाठून शर्यत जिकंली तसेच भारतासह त्यांनीही ऑलिम्पिकला पात्र ठरण्याचा मान मिळवला. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार आहे.

भारतीय पुरुषांनी यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही ४ बाय ४०० मीटर शर्यतीत भाग घेतला होता. यंदा महिला संघ मात्र ८ वर्षांनी रिले शर्यतीत पात्र ठरला आहे. १९८४मध्ये रिले शर्यतीत भारतीय महिला संघ पहिल्यांदा पात्र ठरला होता. त्यांची ही एकंदर आठवी वेळ आहे. दुसरीकडे पुरुष संघ चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असून त्यांनी २०००मध्ये सिडनी ऑलिम्पिकला प्रथमच पात्र ठरण्याचा मान मिळवला होता.

आतापर्यंत भारताचे १९ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र-

अॅथलेटिक्समध्ये आतापर्यंत भारताचे १९ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा, स्टीपलचेसपटू अविनाश साबळे यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in