हॉकीस्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाचा शानदार विजय

पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाने कॅनडावर तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ५-० अशी आघाडी घेतली होती.
हॉकीस्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाचा शानदार विजय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी कॅनडावर शानदार विजय मिळविले. भारतीय महिला संघाने कॅनडावर ३-२ असा विजय मिळविला, तर पुरुष संघाने कॅनडावर ८-०ने मात केली. महिला हॉकीमध्ये भारताने तिसरा विजय मिळविला.

पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाने कॅनडावर तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी तीन गोल डागत सामना ८-०ने जिंकला. भारताचा हा ‘ब’ गटातील दुसरा विजय ठरला.

दरम्यान, नीतू सिंगने महिला बॉक्सिंगच्या ४५-४८ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली. यासह तिने किमान कांस्यपदक निश्चित केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in