भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच या सामन्यावर नियंत्रण मिळवले. भारताने शेवटच्या सत्रात चांगला खेळ केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून टॉम विकहॅम (२०व्या आणि ३८व्या मिनिटाला), टिम ब्रँड (तिसऱ्या मिनिटाला), जोएल रिंटाला (३७व्या मिनिटाला) आणि फ्लिन ऑगिल्वे (५७व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताकडून एकमेव गोल गुरजंत सिंग याने ४७व्या मिनिटाला केला.
भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

पर्थ : भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. शनिवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून १-५ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच या सामन्यावर नियंत्रण मिळवले. भारताने शेवटच्या सत्रात चांगला खेळ केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून टॉम विकहॅम (२०व्या आणि ३८व्या मिनिटाला), टिम ब्रँड (तिसऱ्या मिनिटाला), जोएल रिंटाला (३७व्या मिनिटाला) आणि फ्लिन ऑगिल्वे (५७व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताकडून एकमेव गोल गुरजंत सिंग याने ४७व्या मिनिटाला केला.

ऑस्ट्रेलियाने आश्वासक सुरुवात करत तिसऱ्याच मिनिटाला गोल झळकावत सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. ब्रँड याने डाव्या बाजुने चेंडूवर ताबा मिळवल्यानंतर भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला चकवून पहिला गोल केला. श्रीजेशने यजमानांचे अनेक प्रयत्न हाणून पाडल्यानंतर २०व्या मिनिटाला मात्र विकहॅमचे आक्रमण तो रोखू शकला नाही. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने लागोपाठ दोन गोल करत सामन्यात ४-० अशी आघाडी घेतली होती. भारताने चौथ्या सत्रात गुरजंतच्या ताकदवान फटक्यावर गोल करत ही पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण ऑस्ट्रेलियाने सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना आणखीन एक गोल करत दमदार विजय मिळवला. आता दुसरा सामना रविवारी पर्थ इंटरनॅशनर फेस्टिव्हल ऑफ हॉकी येथे खेळवला जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in